युवा ग्रामीण पत्रकार संघाची राहुरी तालुका कार्यकारिणी जाहीर
तालुका अध्यक्षपदी अशोक मंडलिक तर जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे
राहुरी : युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संचलित राहुरी तालुका अध्यक्षपदी अशोक मंडलिक यांची तर उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार, सचिवपदी रमेश जाधव, जिल्हा निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे यांच्यासह तालुका कार्यकारिणीच्या विविध निवडी जाहीर करण्यात आल्या.
आज शुक्रवार दि. २७ ऑक्टोबर रोजी राहुरीत युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी तालुका नूतन कार्यकारणीची बैठक पार पडली, यावेळी या निवडी जाहीर करण्यात आल्या. नाशिक विभागाचे शरद तांबे, जिल्हाध्यक्ष महेश भोसले व मुख्य सल्लागार प्रभंजन कनिंगध्वज यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राहुरी तालुका कार्यकारणीची घोषणा करण्यात आली.
तालुका कार्यकारणीत अध्यक्षपदी अशोक मंडलिक, उपाध्यक्षपदी राजेंद्र पवार, सचिवपदी रमेश जाधव, खजिनदार पदी मनोज साळवे, सेक्रेटरी दिपक दातीर, सहसचिवपदी कमलेश विधाटे, सहसंघटकपदी दीपक मकासरे, संघटक जावेद शेख, प्रसिद्धीप्रमुख म्हणून लक्ष्मण पटारे आणि समीर शेख तर सदस्यपदी मधुकर म्हसे, देवराज मनतोडे आणि जिल्हा कार्यकारणीवर निमंत्रकपदी राजेंद्र म्हसे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
या बैठकी दरम्यान नूतन युवा ग्रामीण पत्रकार संघ राहुरी तालुका सर्व पदाधिकार्यांचा जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.