शिरसगाव येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : शिरसगाव येथे सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील वर्षी कोल्हापूर ते शिरसगाव येथे पायी ज्योत आणण्यात आली होती. यावर्षी तुळजापूर येथून प्रथमदिनी ज्योत आणण्यात आली. त्याचे स्वागत शिरसगाव गोंधवणी शिव येथे गणेशराव मुदगुले, आबासाहेब गवारे, किशोर पाटील, शांताराम गवारे आदींनी करून तेथे मानवंदना देण्यात आली व गावातून सुवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
विजयादशमी दिनी विधिवत होमहवन पूजन करण्यात आले व महाप्रसाद कार्यक्रम झाला. सायं. ५ वा. रेणुकामाता मंदिर येथून रेणुका माता पालखीचा शुभारंभ शांताराम गवारे यांच्या हस्ते झाला. मिरवणुकीत सर्व ग्रामस्थांनी पालखी गुलालाच्या धुराळ्यात हातात घेतली. या प्रसंगी वाद्य पथक व महिलांनी डोक्यावर कलश घेऊन गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संजय थोरात व सर्व सहकारी भक्त मंडळ व पुरोहित यांनी विशेष परिश्रम घेतले.