अहिल्यानगर

श्रीरामपूर नगरपालिका शिक्षक अजय शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

पनवेल येथे नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्काचे वितरण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – पनवेल येथे पार पडलेल्या नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने दिले जाणारे सन २०२२-२३ चे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगरपालिकेच्या शाळा क्र. ८ चे श्रीरामपूर या शाळेचे मुख्याध्यापक अजय दत्तात्रय शिंदे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी सातारा जिल्ह्यातील माण -खटावचे आमदार जयकुमार गोरे, पनवेल महानगरपालिकाचे स्थायी समितीचे नेते राज्याध्यक्ष अर्जुन कोळी, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, राज्य सरचिटणीस अरुण पवार, राज्य महिला आघाडी प्रमुख साधनाताई साळुंके, ट्रस्ट सचिव शिवाजीराव राजवाडे, राज्य सल्लागार नवनाथ अकोलकर, अहमदनगर जिल्हाध्यक्ष फारुकभाई शाह, विजय शेळके, ताराचंद पगारे, सचीन शिंदे, शरद नागरगोजे, भाऊसाहेब कबाडी, सुनिल रहाणे, विलास माळी, अमोल बोठे आदिंसह विविध मान्यवर नेते उपस्थित होते.

पेण येथील प्रसिध्द शिवशाहीर वैभव घरत यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमामुळे पुरस्कारार्थी भारावून गेले. नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांचे १००% वेतन, बदली पोर्टल, अनिर्णित जुनी पेन्शन व नवीन पेन्शन बाबतचा प्रश्न, लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत संघटनेची बैठक घेऊन सोडविण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील अशी ग्वाही माण -खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

राज्य संघाचे अध्यक्ष अर्जून कोळी हे राज्यातील नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न व पाठपूरावा करताना आम्हाला दिसत आहे. आज राज्यातील नगरपालिका महानगरपालिका शिक्षकांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, सक्षम महिला, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श तंत्रस्नेही, आदर्श प्रेरणादायी शाळा, आदर्श प्रशासनाधिकारी आदि पुरस्कारांचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना भरडा, रायगड विभागीय अध्यक्ष वैभव पाटील, कोकण विभागीय अध्यक्ष प्रमोद लांघी, पनवेल महानगरपालिका शिक्षक संघ सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button