अहिल्यानगर

किरण भोसले यांचे डेटा बेस रिकव्हरी विषयांचे व्याख्यान मार्गदर्शक – डॉ मित्रा

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभागाच्या वतीने श्रीरामपूर- शिरसगाव रोड येथील किरण लेवीन भोसले यांचे 26 सप्टेंबर 2023 रोजी “डेटाबेस रिकव्हरी” या विषयावर सत्रात व्याख्यान दिल्याबद्दल व मौल्यवान अंतर्दृष्टी आणि मार्गदर्शन केल्याबद्दल खरोखरच कौतुकास्पद आहे.

तज्ञ सत्रादरम्यान सामायिक केलेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा विद्यार्थ्यांवर खोलवर परिणाम झाला आणि त्यांना तुमच्या अनुभव-आधारित इनपुटचा खूप फायदा झाला. डेटाबेस रिकव्हरीच्या तुमच्या सर्वसमावेशक कव्हरेजने निःसंशयपणे आमच्या विद्यार्थ्यांना मौल्यवान साधने आणि दृष्टीकोनांसह सुसज्ज केले. भोसले यांच्या अमूल्य योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत. तुमच्या कौशल्याने आमच्या विद्यार्थ्यांवर कायमचा ठसा उमटवला आहे आणि आम्ही तुमच्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो असा गौरव डॉ. मित्रा व्यंकटेशन प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभाग, डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, यांनी मनोगत व्यक्त करताना केला.

पुणे येथे किरण लेविन भोसले सिनियर टेक्निकल लीड एच.सी. एल. वतीने डेटा बेस रिकव्हरी तज्ञ मार्गदर्शन व्याख्यान प्रात्यक्षिक दाखविले याबद्दल किरण भोसले चा सत्कार डॉ ‌मित्रा व्यंकटेशन प्रमुख आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभाग, डॉ.डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिंपरी पुणे यांनी केला.

वरील निवडी व अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाबद्दल किरण भोसले यांचे लेविन भोसले, प्रा.डाॅ.बाबुराव उपाध्ये, लक्ष्मणराव निकम, किसनराव वमने, बी.आर चेडे, बिशप अम्बोज रिबेलो, फा.फान्सिस ओहोळ, फा.विशाल त्रिभुवन, एस.पी.पठारे, प्रा.विजय घोलप, प्रशांत पठारे, सि‌.प्रिसिल्ला, फा.भाऊसाहेब संसारे, डॉ.संजय दुशिंग, डॉ राजू साळवे, संजय उपाध्ये, सुरेश शिंदे, प्रवीणराजे शिंदे, ईसाकभाई पठाण, उमेश मुंढे, पी.डी.अमोलीक, पुष्पा कोळगे, गणेश पंडीत, फिलीप पंडीत, सुनिल येवले, सचिन, संजय येवले, रावसाहेब मुगुटमल आदींनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button