धार्मिक

जीवनात संकटात, आनंदात परमेश्वराचे चिंतन करावे- फा. बोधक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथे मतमाउली यात्रापूर्व सहावा नोव्हेना संपन्न झाला तसेच संत तेरेसा यांना सर्व धर्मगुरू यांनी अभिवादन केले. शिक्षक दिन असल्याने कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचा यावेळी भेटवस्तूने सत्कार करण्यात आला.

नोव्हेनाचे सहावे पुष्प गुंफताना फा. प्रमोद बोधक यांनी सांगितले की, आपले ख्रिस्ती जीवन जगताना अनेक दु:ख, अडचणी, व्यथा जीवनात येत असतात. कारण आपल्या स्वत:च्या पुत्राने प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या आई-वडिलांनी, पालक पित्याने, पवित्र मारीयेने या दु:खाला देखील सामोरे गेले होते. ज्या प्रकारे पवित्र मारीया, संत योसेफ व प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या परमेश्वराचा शब्द शिरोभागी ठेवला. प्रत्येक कार्यात त्याने आनंदाने हस्तक्षेप केला. कार्य पुढे नेले. ते परमेश्वराशी एकरूप झाले. आपला आजचा विषय आहे “पवित्र मारिया ख्रिस्तसभेतील एकात्मता” म्हणजेच एकात्मता म्हणजे एकरूपता.

ती प्रभूच्या कार्यासाठी मुक्ती कार्यासाठी एकरूप झाली. एकरूप होत असताना तिला अनेक प्रकारे संकटाला सामोरे जावे लागले. संकटाला सामोरे जात असताना तिने देवाचा प्रत्येक शब्द हा आज्ञाधारकपणे, नम्रतेने, तिने स्वीकार केला म्हणून या एकरूपतेमध्ये या ख्रिस्तसभेतील एकात्मतेमध्ये, पुढे जात असताना सर्वप्रथम तिने आपले जीवन पवित्र ठेवले. तिने देवाच्या पुत्रासाठी चरित्र स्वच्छ ठेवले. तिने नेहमी नम्र राहून परमेश्वराच्या प्रत्येक शब्दाला होकार देत गेली. ती नम्र असल्याने ख्रिस्त परमेश्वर नेहमी नम्र लोकांची स्तुती घेतो. कैवार घेतो म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जो अहंकार आहे तो सर्व आपण काढला पाहिजे. ती एकरूप झाली कारण ती आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीमध्ये संतुष्ट होती.

आज सध्या कोणीच संतुष्ट नाही. आपण काही लोभामुळे असंतुष्ट असतो. प्रभूच्या कार्यासाठी आपण संतुष्ट असले पाहिजे. संतुष्ट असल्यामुळे देवाची जी योजना होती, ती पूर्ण साकार केली. तिने प्रभूचा शब्द नेहमी अंतकरणात ठेवला. जेंव्हा ती एलिझाबेथला भेटायला गेली तेंव्हा आपण दोन गोष्टी घडताना पाहिल्या. पहिली आहे एलिझाबेथला भेटली त्या वेळेस तिच्या उदारातला बालक आहे तो आनंदाने उडी मारतो व एलिझाबेथ ही पवित्र आत्म्याने कृपापूर्ण होते. ती देवाशी एकरूप झाल्यामुळे आपण पाहतो की तिच्या बोलण्यामध्ये किती नाविन्यत दिसते. ती एक आज्ञाधारक होती, देवाची वचन पाळणारी होती. देवाची वचन पाळणारी असल्यामुळे देवाचे प्रत्येक कार्य तिच्या जीवनात परिपूर्ण झाले. आपले जीवन देखील संकटात, आनंदात, दु:खात असो, आपण नेहमी देवाचा धावा करायचा आहे. त्याची स्तुती करावी व नम्र राहून स्तुतीगान करायचे आहे.

या नोव्हेनात हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, संजय पंडित आदी सहभागी होते. येत्या ९ सप्टेंबर रोजी मुख्य नियोजित यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. १० व ११ सप्टेंबर रोजी कबड्डी स्पर्धा होणार असल्याचे हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button