अहिल्यानगर
सुरक्षा अधिकारी शेटे यांचा क्रांतीसेनेतर्फे सत्कार

राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांना सुरक्षा अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल क्रांतीसेनेतर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचा सत्कार करताना क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, डिग्रस ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भिंगारदे, रंभाजी गावडे आदी उपस्थित होते.