अहिल्यानगर
चोरांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन मिळाल्याने शिरसगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुटले
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील शिरसगाव येथे गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या चोरट्यांचा धुमाकूळ संदर्भात सोमवार 10 ऑक्टोबर पासून महात्मा गांधी पुतळ्यासमोर, श्रीरामपूर येथे शिरसगावचे रोहित यादव, शुभम ताके, सुनील ताके, बाबासाहेब कदम, विशाल निघुट, रवींद्र यादव, गणेश पवार, उमेश ताके व ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले होते. या उपोषणाला शिरसगाव ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता.
उपोषणास बसलेल्या ठिकाणी ज्ञानेश्वर मुरकुटे अशोक कानडे, प्रकाश चित्ते, गणेशराव मुदगुले, करण ससाणे, सचिन गुजर, माजी आ भाऊसाहेब कांबळे, सचिन बडदे, तिलक डुंगूरवाल, नागेश सावंत, विजू पवार, आकाश बेग, करण नवले, सोमनाथ वाघचौरे, राधाकृष्ण आहेर, सोमनाथ गोरे, राजेंद्र पाऊलबुद्धे, सरपंच आबासाहेब गवारे, सुरेश मुदगुले आदी मान्यवरांनी भेटी दिल्या. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याशी संपर्क साधला. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनीही उपोषण स्थळी भेट दिली.
गेल्या 15 ते 20 दिवसांपासून रवींद्र यादव, आनंद आचारी आदी ठिकाणी चोऱ्या करून नागरिकांना मारहाण करण्यात आली. नागरिक रात्री जागरण करून पहारा देत आहेत पण अद्याप चोरांचा बंदोबस्त झाला नाही. चोरांचे मनोधैर्य वाढत आहे. शनिवारी रात्री 8:30 वाजता सुभाष जगन्नाथ ताके यांच्या वस्तीवर चोर आले होते. त्यामुळे ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत. यासंदर्भात खा सदाशिव लोखंडे, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला निवेदने दिली. पोलीस अधिकारी यांनी तातडीने शिरसगाव येथे भेट दिली. पाहणी केली अद्याप चोरांचा बंदोबस्त झाला नाही. तरी पोलीस प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त वाढवावी आदी ग्रामस्थांच्या मागण्या होत्या.
शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी सायंकाळी 5 वाजता भेट देऊन शिरसगाव ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करून येत्या 5 दिवसांत प्रश्न मार्गि लावणार असे आश्वासन दिले व उपोषणकर्ते ग्रामस्थांना नारळ पाणी देऊन उपोषण सोडवले. त्यावेळी अशोक कानडे, प्रकाश चित्ते, माऊली मुरकुटे, दिनकर यादव, आबासाहेब गवारे, किशोर बकाल, गणेश मुदगुले, भास्कर ताके, राजाभाऊ गवारे, सुभाश् यादव, प्रवीण गावारे आदी प्रमुख मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.