स्वराज्य पक्षाच्या पहिल्या विद्यार्थी शाखेचे संगमनेर येथे जल्लोषात उद्घाटन
संगमनेर शहर : स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या आदेशाने स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांच्या हस्ते स्वराज्य पक्षाच्या पहिल्या विद्यार्थी आघाडीच्या शाखेचे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर येथे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले.
या शाखेच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, राज्य कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, किरण डोखे, पुष्पाताई जगताप, उत्तर महाराष्ट्र प्रमुख महिला आघाडी मनोरमाताई पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष प्रा.उमेश शिंदे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख महिला आघाडी रेखाताई पाटील, नाशिक महानगर प्रमुख महिला आघाडी निशिगंधाताई पवार, प्रसिद्धी विभाग राज्य कार्यकारणी सदस्य वैभव दळवी, प्रकाश आडके, निखिल सातपुते, महेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वराज्य संपर्कप्रमुख करण गायकर यांनी सांगितले की, कुठली संघटना, पक्ष संस्था जर मजबूत करायचे असतील तर विद्यार्थी आघाडी मजबूत असायला हवी. स्वराज्य पक्षाच्या पहिल्या विद्यार्थी आघाडी शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी आज ज्या विद्यार्थ्यांनी स्वराज्य पक्षात प्रवेश केला ज्यांची नियुक्ती करण्यात आली, त्या सर्व विद्यार्थ्यांनी तन-मन-धनाने स्वराज्य पक्षाचे काम वाढवायचे आहे. तुम्ही स्वराज्य पक्षाचा पाया आहात. पाया मजबूत असला तर निश्चितपणे बिल्डिंगही तितकीच मजबूत होईल. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे या संगमनेर शहरासह नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी चळवळ उभी कराल याची आम्हाला शास्वती आहे. आपल्या सगळ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देतो. तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना अर्ध्या रात्री आवाज द्या ते तुमच्या मदतीला असतील.
विद्यार्थी दशेत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारचे चुकीचे आंदोलन करायचे नाही, जेणेकरून तुमच्या भविष्यातील अडचणी वाढतील. आंदोलन करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी आहोत. जिथे जिथे चुकीचे प्रकार दिसतील ते फक्त आपण वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळवावे. त्या ठिकाणी निश्चितपणे न्याय देण्याचे काम आम्ही सर्व पदाधिकारी करू. तुम्ही शिक्षण क्षेत्रात तुमचे स्वतःचे भविष्य घडवत असताना स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून चांगले काम उभे राहील यासाठी प्रयत्न करा.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी, कार्यकारणी सदस्य विजय वाहुळे, नाशिक जिल्हा प्रमुख प्राध्यापक उमेश शिंदे यांनीही सखोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले. या कार्यक्रमाचे नियोजन नगर जिल्हा प्रमुख इंजि.आशिष कानवडे, तालुकाप्रमुख संदीप राऊत, शहर प्रमुख निलेश पवार यांनी केले. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय शाखा उभारण्यात विशेष प्रयत्न विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष जयराज दुशिंग यांनी केले.
श्रमिक कॉलेज शाखा प्रमुखपदी गणेश राऊत, उपशाखा प्रमुख साई गडाख, सचिव समुवेल थोरात, कार्याध्यक्ष कार्तिक खरात, खजिनदार आदित्य आहेरकर आदींची निवड करण्यात आली. यावेळी नगर जिल्हा उपाध्यक्ष सुरेश कालडा, उपशहर प्रमुख विनोद कोकणे, युवक उपाध्यक्ष विशाल कदम, महिला जिल्हाध्यक्ष पुजाताई पारखे, जिल्हा उपाध्यक्ष वैशालीताई खरात, तालुका सचिव लक्ष्मण सातपुते आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पदाधिकारी उपस्थित होते.