जपमाळेच्या महत्वाने पवित्र मरीयेवरील विश्वास वाढावा- गिल्बर्ट
अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा प्रथम नोव्हेनाने प्रारंभ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगाव मतमाउली भक्तिस्थान येथे मतमाउली यात्रेचे अमृत महोत्सव वर्ष असून यात्रेपूर्व तयारीचा पहिला नोव्हेना संपन्न झाला.
पहिल्या नोव्हेना प्रसंगी “पवित्र माळेचे रहस्य” या विषयावर संत फ्रान्सिस झेवियर चर्च राहाता, व नित्य सहाय्यक माता चर्च अशोकनगर येथील धर्मगुरू गिल्बर्ट दिनिस व मुक्तीप्रसाद यांनी मौलिक भक्तिमय मार्गदर्शन केले. त्यावेळी राहाता येथील धर्मगुरू गिल्बर्ट यांनी प्रतिपादन केले की”आज आपण मतमाउली यात्रेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.
आज पाहिल्या दिवशी पवित्र माळ या विषयावर मनन चिंतन करीत आहोत. जपमालेचा पहिला भाग क्रुसाची खुण, जपमालेस स्मरण केलेप्रमाणे आपल्या तारणाच्या सर्व रहस्यावर विश्वास ठेवणार म्हणून आपल्या स्वभावाचे नुतनीकरण करण्यास आम्ही प्रेशितांचा विश्वास अंगिकार म्हणतो. आपल्यासाठी देवासाठी अद्भुत कृत्यांवर विश्वास त्याच्या मार्गावर आशा चिकाटी आणि आपला विश्वास जपण्यासाठी व्यावहारिक दृष्टीकोन आवश्यक आहे. ते दान आहे. हि सर्व तयारी जपमाळेचा अंतिम अर्थ ख्रिस्ताचे ध्येय तिच्या पुत्राची आई आणि शिष्य म्हणून पृथ्वीवरील मारीयेची तीर्थयात्रा. पवित्र त्रेक्याला गौरविण्यासाठी समाप्त होते.
पवित्र जपमाळमध्ये पवित्र शास्त्र आहे. आजच्या दिवशी आपण या पवित्र विधीमध्ये सहभागी होत असताना पवित्र मातेकडे विशेष प्रकारे आपल्या सर्वांसाठी, भाविकांसाठी आपल्या राज्यासाठी देशासाठी व संपूर्ण जगासाठी याचना करू या. जपमाळेचे महत्व एकमेकांना पटवून देऊ या व आपला विश्वास या पवित्र मारियेव्दारे देवावरील अधिकाधिक वाढावा म्हणून प्रत्येक दिवशी व प्रत्येक शनिवारी तिच्या भक्तीमध्ये आदरपूर्वक आपण सहभागी होऊ या.
पहिल्या शनिवारी चर्च प्रांगणात पवित्र मरियाच्या मूर्तीची हजारो भाविकांच्या सहभागाने भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यात सर्व धर्मगुरू, सर्व धर्मभगिनी, भाविक सहभागी झाले होते. चर्च मध्ये झालेल्या नोव्हेना प्रसंगी प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे, रिचर्ड अंतोनी, मार्कस रूपटक्के, आनंद बोधक, गिल्बर्ट डीनिस, मुक्तीप्रसाद आदी धर्मगुरू सहभागी झाले होते.
येत्या शनिवारी दि ८ जुलै रोजी “पवित्र मरीयेचे ध्येय तुझ्या इच्छेप्रमाणे होवो”या विषयावर नोव्हेनाप्रसंगी निष्कलंक माता चर्च प्रवरानगर, बाळ येशू चर्च बाभळेश्वर येथील धर्मगुरू सहभागी होतील. तरी या कार्यक्रमास भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हरेगाव चर्च प्रमुख धर्मगुरु डॉमनिक, रिचर्ड सचिन व सर्व धर्मभगिनी ग्रामस्थ हरेगाव व उंदीरगाव यांनी केले आहे.