अहिल्यानगर

अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या संगमनेर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब भोर

संगमनेर : अखिल भारतीय क्रांतिसेनेच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी पेमगिरी येथील बाळासाहेब भोर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. क्रांतिसेनेचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे.

याअगोदर भोर यांच्याकडे क्रांतिसेनेच्या युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी होती ती त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली आहे. विशेषकरून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना आपापल्या परीने शक्य होईल त्याप्रमाणे न्याय देण्याचं काम त्यांनी केलं आहे. खांडगाव पेमगिरी रस्त्याचा प्रश्न असेल किंवा प्रवरेच्या पाटाच्या खोदकामात शेतकऱ्यांच्या तुटलेल्या पाईपलाइनचा प्रश्न असेल तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठ्याचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नांबाबद त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे पदापेक्षाही त्यांनी नेहमीच आपल्या कर्तुत्व व कौशल्याला प्राधान्य दिलेलं आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, साहित्य, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात त्यांचे वास्तववादी विचारांचे लेख व कविता खरोखरच आजच्या पिढीला विचार करायला लावणारे आहेत.

भोर यांच्या या निवडीबद्दल क्रांतिसेनेच्या संस्थपिका राज्याच्या माजी महसूलमंत्री डॉ.शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे, सरचिटणीस नितीन देशमुख, राज्य संपर्कप्रमुख मधुकर म्हसे, शिक्षक आघाडी प्रमुख भागचंद औताडे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष दरेकर, जिल्हा प्रमुख नवनाथ ढगे आदींसह कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button