कृषी
उसाचे वजन खाजगी काट्यावर घेण्यास परवानगी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे
: शेतकरी संघटनाच्या अनेक तक्रारी व मागणीला यश आले असून साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचेकडून उसाचे खाजगी काट्यावर केलेले वजन कारखान्यांना ग्राह्य धरणे बंधनकारक असून तशी परवानगी देण्यात आल्याचे 9 नोव्हेंबर च्या पत्राने संबंधिताना कळविले आहे. शेतकऱ्यांनी खाजगी वजन काट्यावर वजन करून नेल्यास कारखान्याकडून तोडबंद, वाहन बंद आदी केल्यास कारखान्याचा गाळप परवाना बंद होणार आहे.मापात पाप व शेतकऱ्यांशी बेईमानी करणाऱ्या कारखान्यांना यामुळे चाप बसणार आहे. अनुसूचित प्रथेवाबत कार्यवाही न झाल्यास जिल्ह्याचे उप नियंत्रक वैधमापन शास्त्र यांचेकडे तक्रार दाखल करता येणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर ) हे सुनावणी घेऊन निर्णय देतील याप्रमाणे पारदर्शक सुविधा मिळेल, अशी माहिती शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिली. शेतकरी प्रश्नावर उच्च न्यायालय विधिज्ञ अजित काळे व सहकारी सतत पाठपुरावे करीत आहेत.