शिक्षणवारी ज्ञान पंढरी
अनिकेत माने-देशमुख एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम
राहुरी | किशोर बाचकर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यात अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथील अनिकेत सिद्धेश्वर माने- देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील माने यांनी कृषी अभियांत्रिकी फोरम राहुरी येथे राहून अभ्यास केला. त्यांनी कृषी अभियांत्रिकी फोरमची एमपीएससी परीक्षेतील निकालाची परंपरा कायम ठेवलेली आहे. त्याबद्दल फोरमद्वारे त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आजपर्यंत कृषी अभियांत्रिकी फोरम मधील अनेक विद्यार्थ्यांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदांवर झालेली आहे.