कांदा अनुदान योजनेचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढ
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राज्य शासनाच्या कांदा अनुदान योजनेचे अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिल पर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून शेतकऱ्यांनी ३० एप्रिल पर्यंत कांदा अनुदानासाठी अर्ज बाजार समितीच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन प्रशासक दीपक नागरगोजे व प्रभारी सचिव साहेबराव वाबळे केले आहे.
शासनाने १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार समिती, थेट पणन अनुज्ञप्ति धारकाकडे अथवा नाफेड कडून लेट खरीप कांदा खरेदी करता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून त्यानुसार दि. ०३ एप्रिल २०२३ ते २० एप्रिल २०२३ या कालावधीत अर्ज स्वीकारण्यात आले.
मात्र अनेक शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत दाखल झाले नसल्याने सदर शेतकरी कांदा अनुदान योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मा.पणन संचालक यांनी सदर अर्ज दाखल करण्यास ३० एप्रिल २०२३ पर्यंत मुदत वाढ दिली असून संबंधित पूर्व शेतकऱ्यांनी कांदा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयानुसार सर्व कागद पत्रांची पूर्तता करून सदर अर्ज श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे असे आवाहन प्रशासक दीपक नागरगोजे व प्र.सचिव साहेबराव वाबळे यांनी केले आहे.