अहिल्यानगर
छत्रपती संभाजीराजे यांच्या अहमदनगर स्वराज्यच्या निमंत्रक पदी कानवडे
संगमनेर शहर : स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य संघटनेच्या अहमदनगर जिल्हा निमंत्रक पदी संगमनेर चे युवा नेतृत्व छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष इंजि. आशिष कानवडे व श्रीरामपूर येथील रोहित यादव यांची निवड स्वराज्यचे प्रवक्ते करण गायकर यांनी केली. शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.
यावेळी बोलताना करण गायकर म्हणाले की, छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये स्वराज्य या संघटनेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरायला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याने ही पुढाकार घेतल्याने आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त केले. स्वराज्य संघटना ही प्रस्थापित लोकांची नसून विस्थापित लोकांना प्रस्थापित करण्यासाठी आहे. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न घेऊन येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे येणार आहेत म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. गाव तिथे स्वराज्य संघटन उभी राहिली पाहिजे. प्रत्येक गाव निहाय स्वराज्याच्या वतीने राबविले गेलेले उपक्रम पोहोचविले पाहिजे. त्या ठिकाणी त्या उपक्रमांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत स्वराज्याची माहिती कळविण्यासाठी आपण येणाऱ्या काळात काम करावे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. याप्रसंगी शिलेदारांना स्वराज्य संघटने विषयी माहिती, ध्येय धोरणे समजून सांगण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने स्वराज्य प्रणित छावा क्रांतिवीर सेनेचे व स्वराज्याचे शिलेदार उपस्थित होते.