कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण पुर्ण

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कृषि शास्त्रज्ञ डॉ. निलेश मगर व डॉ. दिपक गायकवाड यांनी नुकतेच चेन्नई येथील एरोस्पेस संशोधन केंद्र, मद्रास तंत्रज्ञान संस्थेमधुन लहान ते मध्यमवर्गीय प्रकारातील रिमोट ड्रोन पायलट प्रशिक्षण पुर्ण केले.

चेन्नई येथील प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये ड्रोन विषयी सखोल माहिती देण्यात आाली. तसेच प्रत्यक्ष शेतावर औषध फवारणीचे प्रात्येक्षीक करुन दाखविण्यात आले. शेतीबरोबरच ड्रोनचा वापर शेतजमिनीची मोजनी, वनक्षेत्र मोजनी, पिकांवरील रोग आणि किडींचे संर्वेक्षण, आपत्कालीन परिस्थितीमध्ये नुकसानीचा आढावा, सौर उर्जा पॅनल सर्वेक्षण, पिकांवर किटकनाशके तसेच बुरशीनाशकांची फवारणी या कामासाठी ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

सदरचे प्रशिक्षण घेणारे डॉ. दिपक गायकवाड हे कृषि विद्या विषयातील व डॉ. निलेश मगर हे वनस्पतीशास्त्र विषयातील असून विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील लहान व मध्यमवर्गीय ड्रोन प्रकारातील पहिले ड्रोन पायलट पदाचे मानकरी ठरले आहेत.

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या प्रेरणेने तसेच कृषि विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके आणि कृषि संशोधन केंद्र, निफाड येथील गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. कास्ट प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. मुकुंद शिंदे आणि डॉ. गिरीषकुमार भणगे यांचे सदरच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तांत्रिक सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button