श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : एकच मिशन जुनी पेन्शन (old pension scheme) या मागणीसाठी १४ मार्च पासून सुरु असलेल्या २७ संघटनांच्या राज्यव्यापी बेमुदत संपास आज सातव्या दिवशी श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.
सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. राज्य सरकार याबाबतीत उदासीन आहे. त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शांततापूर्ण मार्गाने चाललेल्या संपास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाशजी आदिक, महाराष्ट्र कृषक समाज व श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहिर पाठिंबा आहे असे त्यांनी सांगितले. तसेच आज याप्रसंगी रक्तदान शिबीराला सदिच्छा भेट देऊन सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
यावेळी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तथा श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, आदित्य आदिक व सर्व संघटनांचे प्रतिनिधींसह कर्मचारी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.