निधन वार्ता
पुष्पा सुकळे यांचे दुःखद निधन
श्रीरामपूर : येथील बोरावकेनगर मधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. पुष्पाताई सुखदेव सुकळे यांचे वयाच्या 71 व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. त्या रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयातून माजी कार्यालयीन अधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले व विश्वलक्ष्मी ग्रा. प्रतिष्ठान संस्थापक सुखदेव सुकळे यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या मागे भाऊ, भावजयी असा परिवार आहे.