अहिल्यानगर
इंडियन ऑइल कंपनीच्या डिझेल पाईप लाईन कामाच्या विरोधात करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश
राहुरी शहर/अशोक मंडलिक : नगर ते मनमाड रेल्वे महामार्गाच्या शेजारून जाणाऱ्या इंडियन ऑइल कंपनीच्या डिझेल पाईप लाईन कामाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सोमवार दि. 22 रोजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकी मध्ये इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी व प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांच्या दोन्ही बाजू ऐकून घेत जिल्हाधिकारी यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत चांगलेच धारेवर धरले व याबाबत आठ दिवसात कंपनीने लिखीत स्वरुपात आपले म्हणणे सादर करावे. अशा सूचना केल्या.
यानंतर संतप्त झालेल्या शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख नामदार बच्चू कडू यांचे आभार मानुन त्याच्याशी थेट भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून मंत्रालयात होणाऱ्या पुढिल बैठकी संदर्भात माहिती जाणून घेत बैठकिसाठी उपस्थित असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी प्रहार तालुका अध्यक्ष सुरेश लांबे, विनोद सिंग परदेशी, रवींद्र मोरे, नितीन पानसरे, रवींद्र मांडे, बापु पटारे, प्रशांत पवार, मालोजी शिकारे, गणेश वाघ, राहुल कोकाटे, निशिकांत सगळगिळे आदिंसह प्रकल्प ग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.