अहिल्यानगर

वळण आश्रमशाळेत संविधान जनजागृती व आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न

राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील वळण येथील श्री गाडगे महाराज आश्रम शाळेत नुकतेच “माझे संविधान, माझा अभिमान” या अभियाना अंतर्गत विद्यार्थांना संविधानाची ओळख करून देण्यात आली.
तसेच अनुसुचित जनजाती सप्ताहाचा समारोप आरोग्य मार्गदर्शन शिबिराने करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात धरतीआबा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन करण्यात आली. या प्रसंगी वळण आरोग्य उपकेंद्रातील परिचारिका अंजुम शेख यांनी विद्यार्थांना सीकरसेल, अँनिमियाँ, कुपोषण, मुलींच्या समस्या या विषयी मार्गदर्शन करून आरोग्य राखण्याच्या टिप्स दिल्या. प्रमुख पाहुणे वळण गावचे उपसरपंच एकनाथतात्या खुळे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
तसेच “माझे संविधान, माझा अभिमान” या अभियाना अंतर्गत माध्य. मुख्याध्यापक मंगेश पगारे यांनी संविधानाची कलमे, परिशिष्टे तसेच नागरीकांचे हक्क, जबाबदा-या, कर्तव्य याचा उहापोह करून भारतीय घटनेचे शिल्पकार यांनी हि घटना २ वर्षे ११ महिने व १७ दिवस अविरत मेहनत करून आपल्या बुध्दीकौशल्याने लिहली. जगातील अतिशय उत्कृष्ट गणली जाणारी सर्वांत मोठी लिखित घटना म्हणजे भारतीय संविधान होय, असे सांगुन तो भारताचा राष्ट्रग्रंथ आहे,असे प्रतिपादन केले. तर आजादी का अमृतमहोत्सव या विषयावर प्राथ. मुख्याध्यापक मच्छिंद्र गायकर यांनी स्वांतत्र्य चळवळीला आपल्या भाषणातुन उजाळा दिला.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जेष्ठ शिक्षक गोवर्धन माळी तर प्रास्ताविक संदीप पठारे यांनी केले. शेवटी सचिन लोहार यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुरलीधर पारस्कर, बाळकृष्ण भोर, जगदीश धिवर, सुरेखा भोई ज्योती चतारे ,प्रमिला ठुबे, अशोक चौधरी यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button