अहिल्यानगर
साविञीबाई फुले माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण
अहमदनगर/ जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय आणि सामाजिक वनीकरण विभाग राहुरी यांच्या संयुक्त विद्यामाने शालेय परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम राबविण्यात आला.
या प्रसंगी 58 देशी फळझाडे संस्थेचे माजी सचिव डॉ. डी.बी.यादव यांनी विद्यालयास भेट दिली. यावेळी ते म्हणाले वृक्ष केवळ आपल्या गरजा पुरतात असे नाही तर जीवनात आनंद निर्माण करतात, म्हणून वृक्षारोपन हा आनंदाचा सोहळा झाला पाहिजे. संस्थेचे सभापती डॉ.प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे तसेच सामाजिक वनीकरण विभाग राहुरी प्रक्षेत्र अधिकारी श्रीमती शुभांगी धोटे ( मिस्रा )यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले की वृक्षारोपन बरोबर त्याचे संवर्धन तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक झाड उपक्रम राबविला पाहिजे. सामाजिक वनीकरणच्या प्रक्षेत्र अधिकारी शुभांगी धोटे म्हणाल्या की निरोगी जीवनासाठी झाडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावा.
यावेळी उपमुख्याध्यापक शमशुद्दीन इनामदार, पर्यवेक्षक अरूण तुपविहिरे, प्रकाश शिंदे, बाबासाहेब शेलार, घनशाम सानप, हलिम शेख, रवी हरिश्चंद्रे, सहाय्यक लागवाड अधिकारी गाडे, श्रीमती संत्रे आदी उपस्थित होते. वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन हरित सेनेचे विद्यार्थी आणि सचिव बाळासाहेब डोंगरे यांनी केले.