कृषी

प्रवरेचा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रा सोबत सांमजस्य करार

प्रवरानगर/प्रतिनिधी: लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाद्वारे भारतीय कृषी संशोधन परिषदच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे सोबत सामंजस्य करार झाला असल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे ट्रेनिंग प्लेसमेंट अधिकारी प्रा. महेश चंद्रे यांनी दिली.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून विविध सामंजस्य काराराद्वारे ग्रामीण भागातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कृषिशी निगडित आद्यवत व सखोल तंत्रज्ञान व ज्ञान मिळावे या हेतूने यांनी या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे.
या सामंजस्य काराराद्वारे संस्थेअंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यशाळा, शेतकरी मेळावे, विस्तार शिक्षण, अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन, संशोधन, कृषि विस्तार शिक्षण संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर.जी. सोमकुवार यांनी दिली.
भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), नवी दिल्ली अंतर्गत द्राक्षांसाठी राष्ट्रीय संशोधन केंद्र 18 जानेवारी 1997 रोजी मांजरी, पुणे येथे स्थापन करण्यात आले. यामध्ये सुरक्षित द्राक्ष उत्पादन आणि उत्पादकता यावर धोरणात्मक आणि उपयोजित संशोधन, फळांमधील अन्न सुरक्षा आणि कीटकनाशकांच्या अवशेषांसाठी राष्ट्रीय संदर्भ प्रयोगशाळा, द्राक्षांच्या वाढीव आणि शाश्वत उत्पादनासाठी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण आणि भागधारकांची क्षमता वाढवणे या सर्व प्रकारचे काम केले जाते.
यावेळी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ.आर. जी. सोमकुवार, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे संशोधन समन्वयक भाऊसाहेब घोरपडे, प्रा. अमोल सावंत हे या सामंजस्य करार स्वाक्षरी व देवाणघेवाण करतांना उपस्थित होते व सदर प्रक्रियेसाठी विशेष परिश्रम घेतले. 
या कराराबद्दल लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ना. राधाकृष्ण विखे पाटील, जि.प.मा.अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, विश्वस्त आ. आण्णासाहेब म्हस्के, संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहित उंबरकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. निलेश दळे यांनी या उपक्रमाबद्दल राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी पुणे संस्थेचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Related Articles

Back to top button