अहिल्यानगर
छावा क्रांतिवीर सेनेच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी डुबे तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कानवडे
संगमनेर/बाळासाहेब भोर : स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील शहागड येथे छावा क्रांतिवीर सेनेचा मेळावा व कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी छावा क्रांतिवीर सेनेच्या शेतकरी आघाडी उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी पेमगिरीचे युवा उद्योजक रवी डुबे तर संघटनेच्या उत्तर नगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निमगाव पागा येथील कार्यकुशल युवा नेतृत्व इंजि. आशिष कानवडे पाटील यांची वर्णी लागली आहे.
यावेळी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी रोहित यादव, संगमनेर तालुका अध्यक्ष पदी गणेश थोरात, तसेच संगमनेर, श्रीरामपूर, राहता तालुक्यातील नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या. या नियुक्त्या संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या हस्ते करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमप्रसंगी पेमगिरी, निमगाव, सावरचोळ, नांदुरी या गावातील कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश महासचिव शिवाजीराजे मोरे, युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, नाशिक जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, उपजिल्हाप्रमुख शरद शिंदे, राजाराम शिंदे, अमित कोल्हे संजय चौधरी, ह.भ.प.खडके महाराज, पेमगिरीच्या सरपंच सौ. द्वारका डुबे, पोलीस पाटील मिलिंद टपाल, गोरक्षनाथ गोपाळे, नांदुरीचे उपसरपंच मिननाथ शेळके, निमगाव खुर्द सरपंच श्री गोपाळे, सावरचोळचे सरपंच सौ.अनिता कानवडे, जादूगार के. भागवत, छावा क्रांतिवीर सेनेचे सर्व पदाधिकारी व शहागड युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.