अहिल्यानगर

लोणी खुर्द ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात

लोणी प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठया असलेल्या लोणी खुर्द ग्रांमपंचायतीने कोरोणा काळात समस्त ग्रांमस्थांच्या अरोग्याची काळजी घेणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांना दोन महीन्यांच्या दिवाळी बोनसपोटी पाच लाख ८४ हजारांची रक्कम कपडे व पंधरा कीलो साखर वाटप करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे.
राहाता तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या लोणी खुर्द ग्रांमपंचायतीने जेष्ठ नेते एकनाथ घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व गावचे सरपंच जनार्दन घोगरे यांच्या नेतृत्वाखाली गावात विकास कांमाचा डोंगर उभा केला आहे.कोरोणा काळात सर्वचजण घरात बसुन होते. मात्र ग्रांमपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी गावासाठी कार्यरत होते. अरोग्य, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता अशा आवश्यक कामात ग्रांमपंचायतीचे तिस कर्मचारी स्वतःला झोकुन देवुन काम करत होते. या कर्मचाऱ्यांना दिवाळीं साठी ग्रांमपंचायतीने साठ दिवसांचा बोनस पाच लाख ८४ हजार, कपडे व पंधरा कीलो साखर देण्यात आली. त्याच बरोबर सेवा सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना देखिल साखर वाटप करून त्यांची दिवाळी गोड केल्याची माहीती जनार्दन एकनाथ घोगरे यांनी दिली. 

यावेळी सरपंच जनार्दन घोगरे, उपसरपंच आर्चनाताई आहेर, विलास घोगरे, उत्तमराव आहेर, आप्पासाहेब घोगरे, आनिल आहेर, श्रीकांत मापारी, कैलास आहेर, जालिंदर मापारी, प्रा. सतिश आहेर, रणजित आहेर, दिपक घोगरे, सचिन आहेर, सुहास आहेर, गौतम आहेर, भास्कर आहेर, वसंत घोगरे, आमोल कोरडे, दुर्गादास घोगरे,ग्रामविकास आधीकारी गणेश दुधाळे उपस्थित होते. दोन महीन्यांचा भरीव बोनस मिळाल्याने कामगारांमधुन समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Back to top button