मराठवाडा
सखारामजी बापू फदाट यांच्या निवासस्थानी जि.प. अध्यक्ष वानखेडे यांची सदिच्छा भेट
राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी माजी सभापती तथा मा. जिल्हा परिषद सदस्य सखारामजी बापू फदाट यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी उत्तमराव वानखेडे यांनी सखारामजी बापू फदाट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मागील काही आठवणींना उजाळा देऊन, अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य देविदास पैठणे, भास्कर फदाट, युवा नेते हर्षल बापू फदाट उपस्थित होते.