अहिल्यानगर
शिवश्री राहुल ढेंबरे यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार जाहीर…!
संगमनेर/बाळासाहेब भोर : शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे यांना मनुष्यबळ विकास अकादमी तर्फे दिला जाणारा आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2021 जाहीर करण्यात आला आहे.
शिवप्रतिष्ठान संघटनेच्या माध्यमातून श्री ढेंबरे यांनी शेतकरी, कामगार, शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी,अशा विविध क्षेत्रातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केलं. गोमातेला राष्ट्रमाता घोषित करावे यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सह्यांची मोहीम राबविली होती. सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या 21 व्या वर्षातील गुणीजन गौरव महापरिषद पुरस्कार निवड समितिने ढेंबरे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ विजयकुमार शहा यांच्या उपस्थितीत 24 डिसेंबर रोजी पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.