अहिल्यानगर

56 वर्षानंतर मुळानगर मध्ये लखलखाट…

राहुरी विद्यापीठ/ जावेद शेख : वरवंडी मुळानगर ग्रामपंचायत अंतर्गत मुळानगर येथे ग्रामपंचायत निधी अंतर्गत स्ट्रीट लॅम्प (दिवा) याचे उदघाटन करण्यात आले. मुळानगर हे गाव शासकीय वसाहत असल्याने या ठिकाणी कुठलाही शासकीय निधी प्राप्त होत नव्हता. 56 वर्षांपासून कुठलाच ग्रामपंचायत निधी हा वापरता येत नव्हता. यासाठी ना. प्राजक्त तनपुरे यांनी मुळानगर गावासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. तसेच ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख यांनी ना. प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाटबंधारे विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावला. त्याचेच यश म्हणजे आज स्ट्रीट लॅम्प या कार्यक्रमाचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाऊसाहेब कोळेकर तर उद्घाटन प्रवीण लोखंडे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सलीमभाई शेख, सदस्य मुन्नाबाई परदेशी, सदस्य प्रियांका त्रिभुवन, वरीष्ठ नागरिक मगर मामा, वायसे मामा, लक्ष्मण बर्डे, अर्जुन निकम, शबरी माता संस्था अध्यक्ष दीपक बर्डे, आदिवासी नेते कैलास बर्डे, दिलीप बर्डे, बाळाभाऊ जाधव, शक्तीलाल गंगे, राजू बिराडे, शक्ती वाधवा, नारायन निकम, जालिंदर गायकवाड, राजेश परदेशी, रंगलाल परदेशी, आदेश गंगे, सुनील माळी, विजय माळी, अमोल शेलार, नितीन भोसले, मुज्जू शेख, कैलास बिराडे, मझहर मडकेश्वर, रमेश पोपळघट, हर्षद बिराडे, आकाश बिराडे, अशोक गायकवाड, हर्जित माळी, गणेश पवार, शुभम त्रिभुवन, धनु पाटोळे, सुमित पालघडमल, साहिल शेख, रमेश निकम तसेच आयेशा शेख, रश्मी वाधवा, सुनीता बिराडे, ज्योती बिराडे, हरिचन्द्रे मावशी, देठे मावशी, भुजाडी मावशी, मुन्नीताई मडकेश्वर, संगीता मणतोडे आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

स्ट्रीट लॅम्प बसविण्याचे काम स्थानिक कर्मचारी दीपक नवसारे, सागर गायकवाड हे करीत आहे. यावेळी ग्रामस्थांनी ना. प्राजक्त तनपुरे, पाटबंधारे, ग्रामविकास विभाग तसेच सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचेही मनापासून आभार मानले.

Related Articles

Back to top button