अहिल्यानगर
स्वराज्य संघटनेच्या नगर जिल्हा आढावा बैठकीचे श्रीरामपूर येथे आयोजन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यात स्वराज्यच्या विस्तारासाठी छत्रपती संभाजीराजे दौरा करणार असून या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी श्रीरामपूर अपूर्वा हॉल संजीवन हॉस्पिटल शेजारी येथे दि.१८ जानेवारी रोजी स्वराज्य च्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती निमंत्रक नगर जिल्हा रोहित यादव व आशिष कानवडे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यात स्वराज्य प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शाखा अनावरण सोहळा संपन्न होणार असुन पुर्व तयारीसाठी श्रीरामपूर शहरात आढावा बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत गाव तिथे शाखा घर तिथे स्वराज्य हे अभियान राबविण्यात येणार आहे. आढावा बैठकित मार्गदर्शन करण्यासाठी स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते व प्रदेश संपर्क प्रमुख करणभाऊ गायकर, मराठवाडा उपाध्यक्ष आप्पासाहेब कुढेकर, राज्य निमंत्रक केशव गोसावी, गंगाधर काळकुटे, शिवाजीराजे मोरे, उमेश शिंदे, विजय वाहुळे, नवनाथ शिंदे, विजय खर्जुल, आशिष हिरे, डॉ रुपेश नाठे, ज्ञानेश्वर थोरात, पुंडलिक बोडके, मयूर पांगरकर, मधुकर शिंदे, योगेश शिंदे आदी पदाधिकारी उपस्थितीत राहणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी स्वराज्य संघटनेत सहभागी होण्यासाठी व स्वराज्य उभारणीत योगदान देण्यासाठी आढावा बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा निमंत्रक आशिष कानवडे, रोहित यादव यांनी केले आहे.