अहिल्यानगर

राष्ट्रीय वयोश्री योजनेमुळे श्रीरामपुरात हजारो वृद्धाची मोफत तपासणी

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : भारत सरकार सार्वजनिक न्याय व अधिकारिता मंत्रालय वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ विठ्ठलराव विखे पा. फौंडेशन अहमदनगर, सुगम्य भारत अभियान, जिल्हा अपंगदिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचा ७५ व्या अमृत महोत्सव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ६० वर्षावरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर खा. सुजय विखे पाटील, आ. राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून दि १७ ऑक्टोबर रोजी पटेल हायस्कूल, मुळाप्रवरा मागे, श्रीरामपूर येथे सकाळी ९ ते संध्या. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते.


त्यात ११०० वृद्ध महिला, पुरुषांनी मोफत कानांची, डोळ्यांची तपासणी करून घेतल्याने वृद्धाना फार मोठा आधार देण्याचे कार्य डॉ विठ्ठलराव विखे पा. फौंडेशन या संस्थेने केले आहे व सर्वाना विविध प्रकारचे आवश्यक साहित्य लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती श्रीरामपूर खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुद्गुले यांनी दिली. आ.राधाकृष्ण विखे पा. दिवसभर ४ वाजेपर्यंत थांबून सर्वांशी संवाद साधला. मोफत डोळ्यांची व कान तपासणी करून नंबरचा चष्मा, काठी, श्रवणयंत्र, कृत्रिम दात, कुबड्या, वॉकर, व्हील चेअर, व्हील चेअर [कम्मोड], गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन बूट इनसोल इत्यादींचे वाटप महिन्यात करण्यात येणार आहे. तसेच काही वृद्ध तपासणीसाठी राहिले असल्यास त्यांना मोफत तपासणीसाठी नेण्याची व्यवस्था केली आहे. त्यानाही साहित्य दिले जाईल आज प्रचंड गर्दीने काही गैरसोय झाल्याने पुन्हा शिबीर घेऊन उत्तम नियोजन करणार आहोत अशी ग्वाही आ.राधाकृष्ण विखे पा. यांनी शिबिराचे शुभारंभ प्रसंगी दिली. त्याचप्रमाणे येत्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत सर्वाना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असेही आ.राधाकृष्ण विखे पा.म्हणाले.

या शिबीर प्रसंगी सभापती दीपक पटारे, नानासाहेब शिंदे, गणेश मुद्गुले, शरद नवले, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्रकाश चित्ते, मारुती बिंगले, बबन मुठे, जि प.सदस्य संगीता गांगुर्डे, मार्केट कमिटी सभापती संगीता शिंदे, उपसभापती नितीन भागडे, युवा मोर्चा दत्ता जाधव आदींनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button