अहिल्यानगर

कैलास पवार यांना राज्यस्तरीय गुनिजन गौरव महापरिषद आयोजित राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीर

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री मा.अलका कुबल यांच्या प्रेरणेतून 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीद वाक्य घेऊन स्थापित भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी सेवाभावी वृत्तीने अनेक सेवाभावी लोकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागात उत्कृष्टरित्या कार्य हाती घेतले असून जागतिक पातळीवर मानल्या जाणाऱ्या कोरोनाच्या संकट काळात देखील शेकडो विधवा निराधार महिलांना किराणा किट वाटप असेल निराधार कर्णबधिर वृद्धांना मोफत श्रवण यंत्र वाटप असेल किन्नर समाज यांच्या न्याय हक्कासाठी शासनाकडे विविध मागण्या करत कोरोनाच्या काळात हजारोच्या वर वंचित किन्नर समाजाला जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात असेल तसेच चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्न ,वस्त्र इत्यादींची मोठी मदत असेल अनेक वृद्धाश्रम, अनाथाश्रम इत्यादी ठिकाणी विविध स्वरुपात उपयुक्त उपक्रम राबविले असेल या सर्व केलेला सेवाभावी कार्याची दखल घेत

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुनिजन गौरव महापरिषद 2021 या निमित्ताने “राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार 2021” या वर्षीचा पुरस्कार भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष कैलास पवार यांना जाहीर झाला आहे.
येत्या 24 डिसेंबर 2021 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असून सदर पुरस्कार आकर्षक मानपत्र, ट्रॉफी, मिडल, शाल पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य अशा समारंभात सन्मानित करण्यात येणार आहे.या जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल संस्थेचे मार्गदर्शक प्राचार्य टी इ शेळके व साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये, डॉ.बाळासाहेब मुरादे, डॉ.अविनाश देसाई, डॉ. शंकरराव गागरे, इन्स्पेक्टर रवींद्र गव्हाणे साहेब,सामाजिक न्याय विभाग पुणे सा.आयुक्त संगीता डावखर, महिला व बालकल्याण विभाग पुणे मोहन सरगर साहेब, गोविंद इसानकर साहेब, जेष्ठ पत्रकार प्रकाश कुलथे, आरोग्य मित्र भीमराज बागूल, जेष्ठ पत्रकार बाबासाहेब चेडे इत्यादींनी पवार यांचे अभिनंदन केले असून त्याच बरोबर मित्रपरिवार, नातलग अशा विविध स्तरावर अभिनंदन होत आहे.

Related Articles

Back to top button