अहिल्यानगर
वंचित बहुजन युवा आघाडीची नियोजन बैठक संपन्न
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : वंचित बहुजन युवा आघाडीचे अहमदनगर जिल्हा निरिक्षक ऋषिकेश नांगरे पाटील यांच्या आदेशाने वंचित बहुजन युवा आघाडीचे महासचिव आप्पासाहेब मकासरे व जिल्हा उपाध्यक्ष योगेश बोरुडे यांचा मार्गदर्शनाखाली आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत योग्य नियोजन करण्यासाठी व पक्ष बांधणी संदर्भात युवा आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सर्व सामान्यांचे प्रश्न युवकांनी एकत्र येऊन सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, आगामी निवडणुकीत युवा कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन केल्यास विजय निश्चित मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. युवा जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट यांच्या उपस्थितीत अनेक युवक पक्ष प्रवेश करणार आहे. यावेळी युवा महासचिव आप्पासाहेब मकासरे, युवा संघटक प्रवीण ठुबे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार निलेश गव्हाणे यांनी मांडले.