अहिल्यानगर

१७ ऑक्टोबर रोजी श्रीरामपूर येथे वृद्धांसाठी साहित्य वाटप-मुदगुले

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : भारत सरकार सार्वजनिक न्याय व अधिकारिता मंत्रालय वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, डॉ विठ्ठलराव विखे पा.फौंडेशन अहमदनगर, सुगम्य भारत अभियान, जिल्हा अपंग दिव्यांग पुनर्वसन केंद्र अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वतंत्र भारताचा ७५ व्या अमृत महोत्सव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ६० वर्षावरील नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना अंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबीर खा.सुजय विखे पाटील, आ.राधाकृष्ण विखे पा. यांच्या प्रयत्नातून दि १७ ऑक्टोबर रोजी पटेल हायस्कूल, मुळाप्रवरा मागे, श्रीरामपूर येथे सकाळी ९ ते संध्या ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीरामपूर खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुदगुले यांनी दिली.

मोफत तपासणी करून नंबरचा चष्मा, काठी, श्रवणयंत्र, कृत्रिम दात, कुबड्या, वॉकर, व्हील चेअर, व्हील चेअर[कम्मोड], गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा, सिलिकॉन बूट इनसोल इत्यादींचे वाटप करण्यात करण्यात येणार आहे. त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा व त्यासाठी शिरसगाव परिसरातील नागरिकांनी नाव नोंदणी शिरसगाव विठ्ठल मंदिर येथे निलेश यादव व अमोल जानराव यांच्याकडे करावी. येताना आधार कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावेत. अधिक माहितीसाठी गणेशराव मुद्गुले तसेच राधाकृष्ण विखे पा. जनसंपर्क कार्यालय श्रीरामपूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button