अहिल्यानगर
‘ शिवसेना एक नंबरचा पक्ष हेच शिवसैनिकांचे लक्ष ‘ या धरतीवर श्रीगोंद्यात शिवसेनेचा झंझावात
श्रीगोंदा प्रतिनिधी/सुभाष दरेकर : शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवकांचे आशास्थान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व जलसंधारण मंत्री ना. शंकररावजी गडाख, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर, जिल्हाप्रमुख शशीकांत गाडे आणि युवा सेना संपर्कप्रमुख संजयजी साटम, युवासेना जिल्हा प्रमुख रविभाऊ वाकळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी, जोशी वस्ती येथे शिवसेना युवसेना संपर्क कार्यालय व शाखा उद्घाटन शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या हस्ते रविवार दि. 10 ऑक्टोबर 2021 रोजी मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले.
या शाखेमध्ये दोनशे शिवसैनिक युवासैनिक समावेश आहे. तालुक्यामध्ये शिवसेनेचा भगवा झंझावात आता सुरू झाला आहेे. मोठ्या प्रमाणात तरुण शिवसेनेमध्ये येत आहेत. तालुक्यामध्ये ‘ शिवसेना एक नंबरचा पक्ष हेच शिवसैनिकांचे लक्ष ‘ या धरतीवर सर्व शिवसैनिक काम करीत आहेत. या शाखेेेच्या शिवसेना शाखाप्रमुख म्हणून गोपीनाथ गोंडे, उपशाखा प्रमुख शिवसेना सचिन मुंडेकर, युवासेना शाखा प्रमुख दादा मुंडेकर, युवा सेना उपशाखा प्रमुख संदीप शिंदेे, शिवसेना शाखा सचिव ऋषिकेश ठुबेे, शिवसेना शाखा सल्लागार बाबूभाई शेख, युवा सेना शाखा सचिव सागर शिंदेे, युवा सेना शाखा सल्लागार नितीन गोंडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसेना ज्येष्ठ नेते सुरेश देशमुख, युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद नागवडे, युवा सेना शहर प्रमुख ओमकार शिंदे, युवा सेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख कृष्णा भालेराव, युवासेना उपशहर प्रमुख जयराज गोरे, शिवसैनिक अक्षय खेतमाळीस, ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब मांडेे, ज्येष्ठ शिवसैनिक धनवट मामा व सर्व शिवसैनिक युवा सैनिक जोशी वस्तीी, श्रीगोंदा फॅक्टरी, मढेवडगाव, वांगदरी येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.