अहिल्यानगर
मंदिर परिसरात कोविड नियमांचे तंतोतंत पालन करा- डॉ.दिपाली गायकवाड
मानोरी : मंदीर परिसरात भाविकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी…
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : श्री रेणुका माता मंदिर परिसरात कोविड नियमांचे तंतोतंत पालन करून मास्क वापरणे बंधनकारक करा, अशा सूचना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दिपाली गायकवाड यांनी केल्या आहेत.
व्हिडिओ : मंदीर परिसरात भाविकांची आरोग्य विभागामार्फत तपासणी…
राहुरी तालुक्यातील मानोरी येथे नवराञ उत्साहानिमीत्त श्री रेणुकामाता मंदिर परिसरात कोविड च्या पार्श्वभूमीवर डाॅ.दिपाली गायकवाड, डॉ.अशोक देठे, डॉ.मल्हारी कैतके यांनी आरोग्य विभाग देवस्थानची पाहणी करून विश्वस्तांबरोबर बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचारी आणि स्थानिकांना देखील सुचना केल्या आहेत. त्यांनी सांगितले नवराञ उत्साहाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरामध्ये सर्व कोविड नियमांचं पालन करून मंदिर परिसरात, सॅनिटायझर वापराने, सुरक्षित अंतर ठेवावे आणि मास्क वापरने बंधनकारक करा.
या प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नानासाहेब आढाव, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक उत्तमराव आढाव, संभुगिरी महाराज गोसावी, कचरू आढाव, निवृत्ती आढाव, शामराव आढाव, दिलीप थोरात, दिलीप आढाव, रावसाहेब पोटे, प्रकाश चोथे, पोपटराव सोनवणे, माधव आढाव, सोन्याबापु बरबडे, एकनाथ थोरात, आप्पासाहेब आढाव, लक्ष्मण आढाव, दत्तात्रय कणसे, सौ.शुभांगी कोहकडे, वैशाली थोरात, सुनिता माने, उर्मिला कोहकडे, गयाबाई डोळस, कल्पना आढाव आदि उपस्थित होते.