अहिल्यानगर
तीर्थक्षेत्र वनी येथून आलेल्या नवरात्र ज्योतीचे उत्साहात स्वागत
वांबोरी प्रतिनिधी : तीर्थक्षेत्र वनी येथून आलेल्या नवरात्र ज्योतीचे वांबोरी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. वांबोरी गावाचे आराध्य दैवत जगदंबा माता मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणाहून ज्योत आणण्यात येते. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठ मुंबादेवी, काळुबाई, तुळजापूर तसेच अनेक तीर्थक्षेत्रावरून ज्योत आणण्यात आली आहे. यावर्षी ज्योत आणण्यासाठी तीर्थक्षेत्रवनी सप्तशृंगी माता ते वांबोरी असा प्रवास करीत पायी ज्योत आणण्यात आली. यासाठी भाऊसाहेब शेजवळ यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. ज्योत वांबोरी येथे आली असता त्याचे स्वागत श्री संत सावता माळी युवक संघातर्फे करण्यात आले.
यावेळी रंगनाथ जाधव, दादा देवकर, गोविंद जाधव, शुभम देवकर, सातपुते, मिथुन डोळसे, मनोज देशमाने, सोमनाथ शिरसागर, नारायण जाधव, अक्षय गाधंले, ओम साखरे, श्री संत सावता माळी युवक संघाचे अशोकराव तुपे, दिपक साखरे, सुनील शिंदे, भरत सत्रे, सोमनाथ कुऱ्हे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.