अहिल्यानगर

शिर्डी येथे एजुकेशन कॉम्प्लेक्स, वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रयत्न करावेत : अजित कदम

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : ध्येय फौंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने श्रीरामपूर येथे श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे नूतन विश्वस्त श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधा आदिक व अविनाश दंडवते यांचा सत्कार शिवबा हॉल श्रीरामपूर येथे प्रमुख अतिथी व माजी विश्वस्त अजित कदम यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


त्यावेळी अनुराधा आदिक व अविनाश दंडवते या नवनियुक्त विश्वस्तांचा सत्कार माजी विश्वस्त व माजी सदस्य उर्जा विभाग महाराष्ट्र शासन अजित कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी अजित कदम यांनी सांगितले की, आज हे दोघे शिर्डी संस्थांमध्ये जात आहेत ही अभिमानाची बाब आहे. हे संस्थान भारतातील क्रमांक दोनचे देवस्थान आहे. तेथे काही घडले की काही मिनिटात देशभर जाते. त्या ठिकाणी खात्री आहे की आपण विचारपूर्वक निर्णय घेणार आहात. येथे राजकीय असा काही विषय नाही.


संस्थामध्ये येणारा पैसा हा शिक्षण व वैद्यकीय क्षेत्राकरिता वापरला गेला पाहिजे. आजारी माणसांना त्याचा जास्त लाभ घेता आला पाहिजे. त्या ठिकाणी एजुकेशन कॉम्प्लेक्स उभारावे, विधायक कामात हे दोन्ही विश्वस्त आपल्याला निश्चित मदत करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. अनुराधा आदिक यांनी प्रथम जय शिवराय, जय जिजाऊ असे घोषवाक्य बोलून अभिवादन केले व साईबाबा चरणी व माझे वडील गोविंदराव आदिक यांच्या स्मृतीस वंदन करून अभिवादन करते. आमच्यासाठी माजी विश्वस्त अजित कदम हेही आलेत. माझी जी संस्थानला निवड झाली माझे आजोळ सुद्धा शिर्डीचे आहे, आजोबांनी संस्थानला जमीन सुद्धा दिली. जन्म सुद्धा शिर्डीला झाला. हे सुद्धा माझे भाग्य आहे, श्रीरामपूरमध्ये माझ्या पाठीशी आपण सार्वजण असल्याने नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली, चांगले वाईट अनुभव आले.


शिर्डीला फक्त महिला म्हणून मला संधी मिळाली साईबाबाचा आशीर्वाद मिळाला. येथे रक्तदान इ शिबिरे, उपक्रम घेतल्याचा मला आनंद वाटला. फटाक्यांची आतषबाजी व भव्य स्वागत केले त्या सर्वांना धन्यवाद दिले. त्यावेळी अध्यक्ष ध्येय फौंडेशन राजदीपसिंह जाधव यांनी प्रास्तविक करताना ध्येय फौंडेशन यांच्या वतीने घेतलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. गौरव मालोदे यांनी सूत्र संचालन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी सत्कार करून दोन्ही नवनियुक्त विश्वस्त यांना शुभेच्छा दिल्या व सत्कार केला. यावेळी राजदीपसिंह जाधव मित्रमंडळ, मराठा प्रतिष्ठान आधारस्तंभ विलासराव जाधव, सीमाताई जाधव, जयंत चौधरी, अर्जुन आदिक, अध्यक्ष सुरेश कांगुणे व सर्व सहकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button