गुन्हे वार्ता

वेटरच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : राहुरी शहराजवळील हॉटेल साक्षी येथे एका परप्रांतीय नेपाळी वेटरच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. सोनू थापा असे त्या मयताचे नाव आहे.

दरम्यान, नामदेव नामक वेटर या घटनेनंतर पसार झाला आहे. तो शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. हे दोघेही हॉटेल मध्येच मुक्कामाला रहायचे. खुनाचे कारण अद्याप समजले नाही.
शनिवारी रात्री मध्यरात्री नंतर २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी संदीप मिटके व राहुरीचे पोलीस आज सकाळी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. नगर- मनमाड हायवेवर हे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये हा थरार झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान मागील काही दिवसांत अनेक खून झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. अनेक गुन्हेगारी घटनांनी ढवळून निघत आहे. मागील काही दिवसांत अनेक खून, दरोडे आदी घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील वातावरण अशा गुन्हेगारी घटनांनी ढवळून निघाले आहे.

Related Articles

Back to top button