अहिल्यानगर

कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना

लोणी प्रतिनिधी :- लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापन केल्याची माहिती कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे संपादक प्रा.अमोल सावंत यांनी दिली.


भारत निवडणूक आयोगाच्या “मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग” कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती व्हावी, त्याच्यामध्ये मतदार म्हणून नावनोंदणी करण्याविषयी, मतदान करण्याविषयी आणि लोकशाहीविषयी जागरूकता व्हावी या उद्देशाने कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक साक्षरता मंडळाअंतर्गत मतदार नोंदणी, संपुर्ण मतदान प्रक्रिया व त्या संदर्भात असणाऱ्या बाबी याविषयी स्पर्धा, नाटक व खेळ इ.उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच विविध वेबसंवाद, चर्चासत्रे, व्याख्याने, ऑनलाईन स्पर्धा आणि विशेष दिनांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. ऋषिकेश औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.प्रविण गायकर आणि प्रा.अमोल सावंत यांची नोडल अधिकारी आणि मार्गदर्शक म्हणून नेमणूक करण्यात आली. कार्यकारी समितीत हर्षल तांबे याची अध्यक्ष, कु.ऋचा खैरनार हिची उपाध्यक्ष आणि संयोजक म्हणून आदित्य जोंधळे यांची निवड करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून विश्वजित घोटेकर, कु.भाग्यश्री नेहरकर, प्रज्वल पठारे, कु.वेदिका वरखडे, प्रसाद नलावडे, स्वप्नील अग्रे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर यांनी विद्यार्थी आणि निवडणूक मंडळाची कार्यकारी समिती यांस मंडळाची रचना, जबाबदाऱ्या व कार्य, ध्येय उद्धिष्ट सर्वसाधारण उपक्रम व मंडळाची वैशिष्ट्ये याविषयी मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी चे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.महावीरसिंग चौहान, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.ऋषिकेश औताडे यांनी कार्यकारी समितीचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषिकेश औताडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रविण गायकर, प्रा.अमोल सावंत, प्रा.स्वप्नील नलगे, डॉ.विशाल केदारी, प्रा.स्वरांजली गाढे, प्रा.सारिका पुलाटे, प्रा.मनिषा आदिक आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Back to top button