अहिल्यानगर
१७ सप्टेंबर रोजी हरिगाव, बेलापूर, खंडाळा व गोंधवणी येथे कायदेविषयक शिबीर
श्रीरामपूर /बाबासाहेब चेडे : दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हरेगाव, बेलापूर, खंडाळा, गोंधवणी येथे श्रीरामपूर येथील न्यायालयाचे न्यायाधीश यांनी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. तरी या गावातील तलाठी, मंडळअधिकारी, ग्रामसेवक यांनी जास्तीत जास्त ग्रामस्थ, नागरिक यांनी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार, श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.