अहमदनगर
राज्यमंत्री तनपुरेंच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण
वृक्षारोपण करताना पंचायत समिती सदस्य रवींद्र आढाव, सरपंच आब्बास शेख व मान्यवर…
आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढाव : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अंबिका माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच डाॅ.राजेंद्र पोटे हे होते. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अंबिका माध्यमिक विद्यालयात वाढदिवसानिमित्त शाळा परिसरात विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते तथा पंचायत समितीचे सदस्य रवींद्र आढाव, सरपंच आब्बास शेख, कचरू आढाव, ह.भ.प.संभुगिरी महाराज गोसावी, माधवराव आढाव, लक्ष्मण आढाव, पोपट पोटे, डाॅ.बाबासाहेब आढाव, गोकुळदास आढाव, आण्णासाहेब तोडमल, भाऊसाहेब आढाव, नवनाथ थोरात, नानासाहेब कांबळे, चाॅदभाई शेख, अंबादास आढाव, अदिनाथ काळे, मनोज खुळे, वसंत आढाव, मुन्सीभाई शेख, सागर नेहे, कौस्तुभ आढाव, संदिप काळे, किरण भिंगारे, संजय गुंजाळ, अशोक काळे, गणेश म्हसे, शिवनाथ डमाळे, प्रकाश तांबे, भारत विटनोर आदि उपस्थित होते.