गुन्हे वार्ता
दिवसाढवळ्या २ लाखांची चोरी
श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : शहरातील प्रभाग ४ मध्ये आशीर्वादनगर भागात दिवसा ढवळ्या चादरी, शाल विकणाऱ्या नाजीम अन्सारी व्यापाऱ्याच्या घरात सकाळी १० वा. रोख रक्कम २ लाख रु चोरीला गेले आहेत.
समजलेली महिती अशी की एक महिला आली व मला एका कार्यासाठी फार मोठ्या चादरी शाली विकत घ्यायच्या आहेत म्हणून घरी आली. नंतर बोलत बोलत त्या महिलेने घरातील महिलेला दूरवर फार अंतरावर नेले. घराच्या त्या महिलेने घराचे कुलूप लावले होते. महिलेने दूरवर नेताना सारखे मोबाईलवर बोलत होती. दूरवर नेल्याने तेवढ्यात कोणीतरी अज्ञात व्यक्ती आल्या व कुलूप तोडून घरातील ३-४ व्यापाऱ्याच्या रोजच्या विक्रीचे आलेले ३ ते ४ पिशव्यात ठेवलेले सर्व मिळून २ लाख रु चे आसपास ५ मिनिटात चोरून नेले आहेत. त्याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार नोंदविली आहे. दिवसा ढवळ्या भरवस्तीत चोरी होणे हे विशेष. जवळपास सीसीटीव्ही असल्यास त्यामुळे चोरीचा तपास लागण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे या भागात मोबाईलवर कोणी कोणाला फोन केले याचा तपास पोलिसांनी केल्यास चोरीचा तपास लागण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस तातडीने तपास करून चोर पकडले जात आहेत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ सुनील दिघे, महेंद्र पवार, गौतम लगड आदींनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास करीत आहेत.