अहिल्यानगर
शिरसगाव येथे न्यायाचार्य डॉ नामदेव शास्त्री यांचा सत्कार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इंदिरानगर येथील श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान आयोजित श्री तुळजाभवानी मंदिर येथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशरोहण सोहळा भगवानगड न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांच्या हस्ते झाला. त्यापूर्वी त्यांनी शिरसगाव येथे मंदिरास भेट दिली व बालसंन्यासी हरिबाबा समाधी व मूर्तिचे दर्शन घेतले. त्यावेळी शिरसगाव ग्रामस्थांच्या वतीने खरेदी विक्री संघ चेअरमन गणेशराव मुदगुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी दिनकर यादव, सोपानराव गवारे, शुभम ताके, पाराजी ताके, बाळासाहेब बकाल, लक्ष्मणराव यादव, भास्करराव ताके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.