कृषी
देवळाली प्रवरा येथे कृषिदूताकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आंबी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचालित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयातील कृषीदूत योगेश बाळासाहेब पठारे यांनी राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. या कार्यक्रमात शेतीवर आधारित जोडधंदे, यांत्रिकीकरण, बीजप्रक्रिया, माती प्रशिक्षण, आधुनिक सिंचन प्रणाली इतर अनेक प्रात्यक्षिक व चर्चासत्रे राबवण्यात आली.
कृषिदूत योगेश पठारे यांनी ज्वारी बियाण्यावर रासायनिक बीज प्रक्रिया याबद्दल प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी शेतकरी राहुल महांकाळ, चंद्रशेखर गायकवाड, शुभम गायकवाड, अजित गडाख, प्रणव गायकवाड, अंजली गायकवाड, वर्षा मोरे यांसह शेतकरी उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद अहिरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. लटके, डॉ. एस. सदाफळ आदींचे मार्गदर्शन लाभले.