अहिल्यानगर
शिवसेनेचे सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना लेखी पाठिंबा
राहुरी प्रतिनिधी : डॉ बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर, ता. राहुरी येथील कारखाना कामगार उपोषण करत आहेत. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे गंगाधर सांगळे यांच्या नेतृत्वाखाली ठराविक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपोषण स्थळी उपस्थित राहत लेखी पाठिंबा देण्यात आला. तसेच साखर कामगार आयुक्त अहमदनगर यांना कामगारांचे असणारे प्रश्न सोडविण्यासाठी लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगळे यांनी सांगितले आहे.
राजेंद्र म्हसे, योगेश घाडगे, कृष्णा पोपळघट, दुर्गेश वाघ, बाळासाहेब पवार, बाळासाहेब लगे, बबन साळवे, रमेश चौधरी यांनी ना. प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन आंदोलकांचे प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. ज्या साखर कामगारांनी राहुरीची कामधेनु सूस्थितीत चालवली जाते. राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे उस खरेदी करून सेवा देत आहे. आज त्या कामगारांना मिळणारे प्रलंबीत वेतन मिळण्यासाठी कामगारांना संचालक मंडळाविरुध्द उपोषण करण्याची वेळ येत आहे. तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष राहुरी तालुका प्रमुख कार्यकर्ते कामगारांचे प्रश्न सोडविण्याकामी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार आहेत. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष राहुरी तालुका प्रमुख कार्यकर्ते उपोषण स्थळी जाऊन सर्व संचालक मंडळाचा जाहिर निषेध करत आहे. व उपोषण करणा-या कामगारांना जाहिर पाठींबा दिला आहे.