क्रीडा

राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धी घुले ची निवड

राहुरी प्रतिनिधीराष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धी घुले ची निवड झाल्याबद्दल राहुरी अर्बन पतसंस्थेचे वतीने शाल श्रीफळ व वृक्ष भेट देऊन अभिनंदन करण्यात आले. 

        या प्रसंगी राहुरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे, कर्मवीर अकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू, डॉक्टर केमिस्टचे चेअरमन डॉ विलास पाटील, पुजारी सर, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस आदी उपस्थित होते. नागपूर, अमरावती, कोल्हापूर, नाशिक, व पुणे झोन मधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राहुरी फॅक्टरी येथील शिवाजी मच्छिंद्र घुले यांची जेष्ठ कन्या कु. सिद्धी घुले यांची दि. २७ ते २९ ऑगस्ट २०२१ अखेर उत्तरप्रदेश मधील गाझियाबाद येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिद्धी घुले ही श्री शिवाजीनगर येथील शिवनेरी क्लब ची खेळाडू असून तिला या स्पर्धेत निवड होण्यासाठी राजेंद्र पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button