अहिल्यानगर

हिरडगावमध्ये आठवडा बाजाराने गावाच्या विकासाला नवी चालना — प्रतिभाताई पाचपुते

श्रीगोंदा प्रतिनिधी : हिरडगाव परिसरात ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या आठवडा बाजाराचे भव्य उद्‍घाटन आज हिरडगाव फाटा येथे माजी जिल्हा परिषद सदस्या व आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्री प्रतिभाताई पाचपुते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सरपंच विद्याताई बनकर व उपसरपंच अमोल दरेकर यांच्या प्रयत्नातून हा उपक्रम साकारला.

गावातील, परिसरातील ग्राहकवर्ग, ऊसतोड कामगार व औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची सोय हा बाजार सुरू करण्यामागचा हेतू असल्याचे सरपंच विद्याताई बनकर यांनी सांगितले.

उद्‍घाटन प्रसंगी प्रतिभाताई पाचपुते म्हणाल्या, “या ओसाड माळरानावर दादांनी कारखाना उभा केला आणि हिरडगावला वैभव प्राप्त झाले. आता आठवडा बाजारामुळे गावाच्या प्रगतीत आणखी भर पडली आहे. श्रीगोंद्याला जोडणाऱ्या मार्गासाठी निधी देऊन रस्ता उत्कृष्ट करणार आहोत. तसेच हिरडगाव फाट्यावर मोठा हायमॅक्स उभारण्याबाबतही आमदार साहेबांना सांगते.”

या कार्यक्रमाला परिसराचे भूषण माऊली महाराज म्हस्के, हनुमंत महाराज पावणे, गौरी शुगरचे महाव्यवस्थापक रोहीदास यादव, पंचायत समिती सदस्या अनुराधाताई ठवाळ, चेअरमन भरत भुजबळ, व्हाइस चेअरमन शोभाताई दरेकर, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब दरेकर यांनी भूषविले. प्रास्ताविक कुकडी सल्लागार समितीचे सदस्य मिलिंद दादा दरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर यांनी मानले. सूत्रसंचालन परशुराम भुजबळ व भाऊसाहेब काळे यांनी केले.

या प्रसंगी अनिल ठवाळ, गंगाराम दरेकर, दत्तात्रय भुजबळ, संपतराव दरेकर, रामभाऊ गुणवरे, दादासाहेब बनकर, चिमाजी दरेकर, सुरेश शेंडगे, संजय ससाणे, रायचंद गिरमकर, नवनाथ गुणवरे, कैलास दरेकर, विजय भुजबळ, संजय दरेकर, विठ्ठल दरेकर, देवराव मोरे तसेच विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button