रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा करू – मंत्री उदय सामंत

राहुरी प्रतिनिधी – शुक्रवार दि.१२ सप्टेंबर रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सामंत नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते.या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख तथा नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे पा.,रोहित नालकर,सागर बोठे,महेंद्र शेळके,सतीश घुले यांनी नगर शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा यासाठी दि.१० सप्टेंबर २५ रोजी कृती समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.यया आंदोलन प्रसंगी ९आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरवा करण्याची मागणी करण्यात आली.
या प्रसंगी देवेंद्र लांबे पा. यांनी भूमिका मांडताना सांगितले कि,कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय सदस्य नगर शिर्डी रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून गेल्या ७-८ वर्षापासून आम्ही पाठपुरवा करत आहोत ,प्रसंगी आंदोलन देखील केलेली आहेत.राहुरी परिसरातून शेकडो तरुण नगर एमआय डीसी येथे कामाला जातात.या रस्त्याच्या दुर्दशेमुळे शेकडो तरुणांचे रस्ता अपघातात मृत्यू झाले आहेत तसेच काहीना कायमचे अपंगत्व आलेले आहे.शेकडो कुटुंब उध्वस्त झालेले आहेत.नगर शिर्डी रस्त्यासाठी नाम.राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा.सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नाम.नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरवा करून वेळोवेळी मोठा निधी आणलेला आहे.परंतु भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अभियंता व ठेकेदार याच्या हलगर्जीपणा मुळे रस्ता पूर्णपणे खराब झाल्याचे श्री.लांबे पा.यांनी म्हंटले आहे.
या प्रसंगी मंत्री उदय सामंत यांनी सांगितले कि मी स्वतः आज शिर्डी ते अहिल्यानगर प्रवास करत आलो आहे.हा महामार्ग अत्यंत खराब झालेला आहे. नगर शिर्डी महामार्गाच्या कामाविषयी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा येणाऱ्या अडचणी समजून घेवून नाम.विखे पाटील यांना सोबत घेवून शासन दरबारी अडचण सोडविण्यासाठी तात्काळ प्रयत्न केले जातील.तसेच या आंदोलना दरम्यान दाखल गुन्हे विषयी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरवा केला जाईल असे नाम.सामंत म्हणाले.