धार्मिक

हरिगाव येथे ७७ वा ‘मतमाउली यात्रा महोत्सव’ १३ सप्टेंबरला उत्साहात साजरा होणार

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे) – संत तेरेजा चर्च, मतमाउली भक्तिस्थान, हरिगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ७७ वा ‘मतमाउली यात्रा महोत्सव’ भाविकांच्या उपस्थितीत १३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३ ते १२ सप्टेंबर दरम्यान भक्तांसाठी विशेष धार्मिक कार्यक्रमांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.

या महोत्सवाची सुरुवात दिनांक ३ सप्टेंबर रोजी सकाळी नाशिक धर्मप्रांताचे महागुरुस्वामी रा. रे. डॉ. बार्थोल बरेटो यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे. त्यानंतर दहा दिवस विविध याजकांनी पवित्र मरीयेच्या आशेच्या विविध पैलूंवर प्रवचने व मिस्सा बलिदानाचे आयोजन केले आहे.

या प्रवचनमालिकेत सहभागी होणारे प्रमुख धर्मगुरू फा. विल्यम फलकाव, माजी महागुरुस्वामी लूरडस डानियल, फा. विश्वास तोरणे, फा. विलास सोनावणे, फा. नेव्हील फर्नांडीस, फा. जॉर्ज डीआब्रीओ, फा. रिचर्ड अंथोनी, फा. ऑलविन कलगटगी आणि फा. जेम्स थोरात – हे विविध सामाजिक व आध्यात्मिक विषयांवर मार्गदर्शन करतील.

यात्रेच्या दिवशी सकाळी ८.३० वा. पवित्र जपमाळ, नोव्हेना व मरीयेच्या शिरावर मुकुटारोहण होईल. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दर तासाला पवित्र मिस्सा बलिदान होईल. दुपारी ४.३० वा. मुख्य मिस्सा बलिदान होईल व त्यावेळी महागुरुस्वामी डॉ. बरेटो यांचे प्रवचन हजारो भाविकांना ऐकायला मिळणार आहे. १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. फा. ज्यो गायकवाड यांचे प्रवचन व मिस्सा होईल. त्याच दिवशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन होईल.

या पवित्र आणि भक्तिपूर्ण महोत्सवामध्ये राज्यभरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज, धर्मभगिनीवृंद, हरिगाव-उंदीरगाव ग्रामस्थ, व चर्च संलग्न सर्वांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button