गणपती गारमेंट्स शॉपीने श्रीरामपूर वैभवात भर घातली – महंत रामगिरी महाराज यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) – श्रीरामपूर शहराच्या व्यापारी व सामाजिक वैभवात भर घालणाऱ्या ‘गणपती गारमेंट्स शॉपी’ या नव्या वस्त्रदालनाचे उद्घाटन म. गांधी पुतळ्यासमोरील प्रमुख व्यापारी भागात मोठ्या उत्साहात पार पडले. या शुभ प्रसंगी गोदा धाम सरला मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते दालनाचे उद्घाटन झाले.
या वेळी बोलताना महंत रामगिरी महाराज म्हणाले, “श्रीरामपूरसारख्या गतिमान शहरात दररोज वाढत चाललेली लोकसंख्या व त्याच्या गरजांनुसार उभ्या राहत असलेल्या व्यापारी सेवा ही या शहराच्या प्रगतीची नांदी आहे. गणपती गारमेंट्स शॉपी हे दालन फक्त व्यवसायाचं माध्यम नसून शहराच्या वैभवात भर घालणारा एक उपक्रम आहे.“
या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. संदीप पवार, संजय तरस, अर्जुन जाधव, श्रद्धानंद महाराज, ह.भ.प. दादासाहेब रंजाळे महाराज, गोरक्षनाथ नेद्रे, विशाल जाधव, बाळासाहेब लबडे, मधु महाराज आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय व प्रेरणादायी झाले होते.
गणपती गारमेंट्स शॉपीमध्ये सर्व वयोगटांसाठी ट्रेंडी व दर्जेदार कपड्यांची विशेष व्यवस्था असून, ग्राहकांची गरज लक्षात घेऊन किफायतशीर दरात सेवा देण्याचा शॉप मालकांचा संकल्प आहे. या नव्या दालनामुळे श्रीरामपूर शहरातील नागरिकांना आता उत्कृष्ट वस्त्र परिधानाच्या पर्यायात आणखी एक विश्वसनीय पर्याय मिळाला आहे.