अहिल्यानगर

उत्कृष्ट कार्याबद्दल डॉ. सोनवणे यांचा सत्कार

राहुरी : तालुक्यातील उंबरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहा वर्षे अत्यंत कौशल्याने सेवा बजावणारे पशुधन पर्यवेक्षक डॉ. नवनाथ भिमराज सोनवणे यांचा नुकताच कोंढवड येथे अखिल भारतीय क्रांतीसेना व पशुपालकांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

डॉ. सोनवणे यांची अलीकडेच अकोले तालुक्यातील लव्हाळी बु. येथे बदली झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट कार्याच्या गौरवस्वरूप त्यांचा निरोप व सत्कार समारंभ उंबरे दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

सन २००८ मध्ये पशुधन पर्यवेक्षक पदावर डॉ. सोनवणे यांची प्रथम नियुक्ती आदोंरा (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे झाली. त्यानंतर त्यांनी २०१५ मध्ये तेर (ता. उस्मानाबाद) येथे कार्य केले. २०१९ पासून ते उंबरे (ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) येथील श्रेणी २ दवाखान्यात सहा वर्षे सेवा बजावत होते.

या प्रसंगी कोंढवडचे माजी उपसरपंच विजय म्हसे, दिलीप म्हसे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, सचिन म्हसे, उपसरपंच किशोर म्हसे, सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन जगन्नाथ म्हसे, रघुनाथ हिवाळे, शंकर औटी, महेश ढोकणे, डॉ. प्रशांत कांबळे, डॉ. राहुल ढोकणे, यश मकासरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. सोनवणे यांनी ग्रामीण भागात पशुधन आरोग्य सेवा पोहोचवताना केलेले योगदान उल्लेखनीय असून, त्यांच्या कार्याने अनेक पशुपालकांचे जीवनमान उंचावले. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत सर्व उपस्थितांनी अभिनंदन व्यक्त केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button