अहिल्यानगर

राहुरीत मनसेच्या वतीने समाजसेवेच्या माध्यमातून शिवजयंती उत्साहात साजरी

राहुरी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राहुरी येथे समाजोपयोगी उपक्रम राबवून शिवजयंती साजरी करण्यात आली. मनसे शहराध्यक्ष प्रतीक विधाते व उपतालुकाध्यक्ष राहुल पिले यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचा अवाढव्य खर्च टाळत गाडगेबाबा आश्रम शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, भोजन व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण जीवन स्वराज्यासाठी अर्पण केले होते. त्याच विचारांवर आधारित समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प मनसेने केला असून, समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच, देसवंडी ग्रामपंचायत सरपंच नितीन कल्हापुरे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, राहुरी तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे, बांधकाम विभाग अधिकारी सय्यद, तसेच महावितरण अधिकारी वीरेश बारसे यांचे देखील सहकार्य लाभले.

कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गाडे, उपजिल्हाध्यक्ष भाऊ उंडे, तालुकाध्यक्ष मनोज जाधव, उपतालुकाध्यक्ष राहुल पिले, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष अरुण चव्हाण, वाहतूक सेना तालुकाध्यक्ष राजू आढगळे, देवळाली प्रवरा शहराध्यक्ष विजय पेरणे, मनवीसे संघटक सागर माने, मनवीसे तालुकाध्यक्ष संदेश पाटोळे, मनवीसे शहराध्यक्ष संदेश गायकवाड आदी मान्यवरांसह मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button